केएसएच्यावतीने महिला फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक अंजू तुरंबेकर यांचा सत्कार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केएसएच्यावतीने गोलकिपर ट्रेनिंग कॅम्पचे मुख्य प्रशिक्षक मारिओ एग्युअर यांच्या हस्ते फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक अंजू तुरंबेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केएसएचे  ऑन.जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक व सहा. प्रशिक्षक सुखदेव पाटील उपस्थित होते.   
       केएसएच्यावतीने १२ ते १८ वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी फुटबॉल गोलकिपर ट्रेनिंग कॅम्प छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू आहे. या ट्रेनिंग कॅम्पला सदिच्छा भेट देण्यासाठी डेंपो फुटबॉल संघाच्या टेक्निकल डायरेक्टर अंजू तुरंबेकर आल्या होत्या. त्यांच्यासोबत डेंपो फुटबॉल संघाच्या १८ वर्षाखालील रेसिडेंशल ॲकॅडेमीचे हेड कोच रेमोज्‌ गोम्स होते. यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे ऑचित्य साधून केएसएच्यावतीने अंजू तुरंबेकर यांचा सत्कार करण्यात आला.
        याप्रसंगी केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक म्हणाले की, अंजू तुरंबेकर या कोल्हापूरातील गडहिंग्लजमधील असून त्यांनी फुटबॉल क्षेत्रात महिला खेळाडू ते ऑल इंडीया फुटबॉल फेडरेशन, ग्रासरूट व इन्स्ट्रक्टर विभागाच्या प्रमुख व एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशनच्या सदस्य म्हणून उत्कृष्ट कामकाज केले आहे. त्यांनी देशभरात विविध ठिकाणी कोर्स व शिबीरे घेतली आहेत. देशातील ६ ते १२ वयोगटातील मुला-मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना त्या प्रशिक्षण देत आहेत. सन २०१७ मध्ये एआयएफएफच्या मिशन इलेव्हन मिलीयन कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. सैन्यदलातही त्यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अशाप्रकारे एका ग्रामीण भागातून महिला फुटबॉल खेळाडू म्हणून त्यांनी प्रवास सुरू करून प्रशिक्षक, मार्गदर्शक, एएफसी सदस्य म्हणून कार्यरत आहेत, असे सांगून भारतीय महिला फुटबॉल खेळाडू अंजू तूरंबेकर यांना केएसएच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!