केएसए टेबल टेनिस प्रशिक्षण विभागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल

कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या (केएसए) टेबल टेनिस प्रशिक्षण वर्गासाठी शासनाच्यावतीने मिळालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेबल टेनिस टेबलांचे उद्‌घाटन केएसए व कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.
     कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडून स्पोर्ट्‌स्‌ नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल मिळाले आहेत. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या सहकार्यामुळे हे टेबल्स्‌ मिळाले आहेत. यामुळे केएसए प्रशिक्षण वर्गातील खेळाडूंना उत्तमरितीने सराव करण्यासाठी संधी मिळाली असून राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करता येईल व राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी मोलाचे सहाय्य लाभणार आहे.
     यावेळी केएसएचे पदाधिकारी दिपक शेळके, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे व कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी राजू भोसले, सुभाष देसाई, संग्राम चव्हाण, प्रणिल इंगळे, प्रताप घोरपडे, सचिन कोगनोळे तसेच केएसए कार्यकारिणी सदस्य प्रा. अमर सासने, संभाजीराव पाटील-मांगोरे, मनोज जाधव, विश्र्वंभर मालेकर – कांबळे, बाळकृष्ण पोरे, दिपक राऊत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *