कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांच्याकडून जोंधळे कुटुंबियांचे सांत्वन

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागात अगर संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च विद्यापीठाच्यावतीने करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी दिली.
     कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गुरुवारी सायंकाळी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी भेट देऊन त्यांचे वडील रामचंद्र हरी जोंधळे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव उपस्थित होते.
     कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठ परिवाराच्यावतीने शहीद जोंधळे यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठातर्फे  ‘शहीद लष्करी, निमलष्करी जवान आणि शहीद पोलीस’ यांच्या अपत्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानुसार शहीद जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्यासही संलग्नित महाविद्यालयीन व विद्यापीठीय शैक्षणिक खर्च देण्यात येईल, असे सांगितले. विद्यापीठाच्यावतीने तसे पत्रही कुलगुरूंनी श्री. जोंधळे यांच्याकडे सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!