कोल्हापूर • प्रतिनिधी
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी कारखाना कार्यस्थळावरील कोविड केअर सेंटरला कुंभी-कासारी साखर कारखान्यामार्फत कोविड रूग्णांकरिता औषधांचा पुरवठा करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके, व्हा. चेअरमन निवास वातकर यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे इनचार्ज डॉ.सुधीर राजदीप यांच्याकडे ही औषधे व इतर साहित्य प्रदान करण्यात आले.
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना आणि कुभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून कारखाना कार्यस्थळावर हे १२० बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये २० ऑक्सीजन बेड, ५० पुरुष आणि ५० महिला रूग्णांच्या उपचाराची सोय आहे. या सेंटरमुळे परिसरातील कोविड रूग्णांची उपचाराची सोय झाली आहे.
कारखाना कार्यस्थळावरील या कोविड केअर सेंटरला व्हा.चेअरमन निवास वातकर यांच्या हस्ते औषधे व इतर साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी संचालक संजय पाटील, जयसिंग पाटील, प्रकाश पाटील, दादासो लाड, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सेक्रेटरी प्रशांत पाटील, डॉ. शशिकांत पाटील, सांगरूळ ग्रामपंचायत माजी सदस्य संभाजी नाळे, मारुती बिरंजे व स्वरूप नाळे आदी उपस्थित होते.
———————————————–