स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळतर्फे अभिवादन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले.  हा दिवस राष्‍ट्रीय दुग्ध दिवस म्‍हणून साजरा केला जातो.
     गोकुळ संघाच्या प्रधान कार्यालयामध्ये माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके  यांच्या हस्ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्यांना जिल्ह्यातील दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी मुंबई येथे झालेल्‍या २६/११ च्‍या दहशतवादी हल्‍यातील वीरमरण पावलेल्‍या शूरविरांना तसेच देशाच्या सीमेवर सेवा करत असताना आपल्‍या जिल्‍ह्यातील शहीद जवान ऋषीकेश जोधळे, संग्राम पाटील हे शहीद झाले, यांनाही गोकुळ परिवाराकडून आदरांजली वाहण्‍यात आली.
     यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील (आबाजी), संचालक विश्‍वास जाधव,पी.डी.धुंदरे,उदय पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही.  घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *