कोल्हापूर • प्रतिनिधी
स्वयंपाक घरात प्रवेश केल्याक्षणी प्रत्येक गृहिणीच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे आज भाजीसाठी नेमकं काय करायचे ? त्यात सध्या कोरोनामुळे मुक्तपणे बाजारपेठेत फिरणे आणि भाजी खरेदी करणे यासारख्या गोष्टींवर कमालीच्या मर्यादा आलेल्या आहेत, त्यामुळे रोजच्या भाजीचा प्रश्न अधिकच बिकट बनत चाललेला आहे. या प्रश्नावर सर्वोत्तम उपाय घेऊन लोकप्रिय उत्पादनांची दर्जेदार परंपरा जपणारे भंडारी ग्रुप कोल्हापूरवासियांच्या सेवेत सादर करीत आहे, दर्जेदार आणि ताजी भाजी घरपोच देणारी आरोग्यदायी अशी “भंडारी ॲग्री फर्म”.
भंडारी ड्रायफ्रुटस व भंडारी माचीस या भंडारी ग्रुपच्या उत्पादनांना अल्पावधीतच लाभलेल्या उत्तम प्रतिसादानंतर खास ग्राहकांच्या आग्रहास्तव भंडारी ग्रुपच्यावतीने कोल्हापूर आणि परिसरातील सर्वासाठी घरपोहोच भाजी विक्री सुविधा देणाऱ्या “भंडारी ॲग्री फर्म” चा शुभारंभ नुकताच ब्रॅडशेफ ॲड एजन्सीचे अमरसिंह भोसले यांच्या हस्ते व अजय भंडारी, नामदेव (नाना) भंडारी, विजय भंडारी आणि भंडारी ग्रुपचे सदस्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात झाला.
अवघ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सर्व गृहिणींच्या खास आग्रहास्तव भंडारी ॲग्री फर्मच्यावतीने बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणाऱ्या निवडक व दर्जेदार अशा भाज्या दररोज ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोच केल्या जाणार आहेत. यासाठी वेळ आहे सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत. तेव्हा आता दररोजच्या भाजीचा प्रश्न विसरायचा असेल आणि आपल्या सोबत आपल्या कुटुंबाला ताजी स्वच्छ व दर्जेदार भाजी आणि पौष्टिक भाजी खायला घालायचे असेल तर भंडारी ॲग्री फर्मच्या घरपोच भाजी योजनेचा अवश्य लाभ घ्या, असे आवाहन भंडारी ग्रुप कंपनीच्यावतीने करण्यात आलेले आहे. यासाठी व अधिक माहितीसाठी ८६४०९५९५९५ संपर्क साधावा.