कोल्हापूर • प्रतिनिधी
राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हेन्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेल निवडणूक लढविणार आहे. हे पॅनेल निवडणुकीसाठी सज्ज झाले असून पॅनेलच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
निवृत्त पाटबंधारे उप अभियंता मधुकर शिंदे, वनविभाग लेखापाल शरद कुलकर्णी, निवृत्त उपकार्यकारी अभियंता राजेंद्र भारती यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचा शुभारंभ झाला.
यावेळी पोलीस, आरोग्य, कृषी, आरटीओ, कलेक्टर ऑफिस, शिक्षण, तहसीलदार कार्यालय इत्यादी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी वन विभागाचे राजेंद्र सावंत, दत्ता सुतार, अमित अवसरे, दिलीप शिंदे, महसूलचे प्रकाश महाडेश्वर यांची प्रोत्साहनपर भाषणे झाली.