जिओ फायबरकडून शुक्रवारपासून ‘एंटरटेनमेंट बोनान्झा’ लॉन्च

Spread the love

• सेट टॉप बॉक्स, इंटरनेट होम गेटवे आणि इंस्टॉलेशन विनामूल्य

कोल्हापूर • प्रतिनिधी
        सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने जिओ फायबर पोस्टपेड ग्राहकांसाठी २२ एप्रिलपासून “एंटरटेनमेंट बोनान्झा” लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
      वास्तविक जिओ फायबरचे रू.३९९ आणि रू.६९९ चे प्लॅन हे बेसिक इंटरनेट प्लॅन होते, जे ३० आणि १०० Mbps चा स्पीड देतात. आता रिलायन्स जिओने या प्लॅनसह मनोरंजनाची सेवा देण्याची घोषणा केली आहे. नवीन आणि विद्यमान दोन्ही ग्राहक या नवीन योजनांचा लाभ घेऊ शकतात.
       घोषणेनुसार, वापरकर्ते १४ OTT ॲप्सचा आनंद लुटण्यास सक्षम असतील अतिरिक्त १०० रुपये किंवा २०० रुपये प्रति महिना भरून अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट प्लॅन ३९९ रुपये प्रति महिना सुरू होईल. अतिरिक्त १०० रुपये भरून, ग्राहक जिओच्या एंटरटेनमेंट योजनेचा लाभ घेऊ शकतील, ज्यामध्ये त्यांना ६ एंटरटेनमेंट OTT ॲप्स मिळतील. २०० रुपयांच्या एंटरटेनमेंट प्लस प्लॅनमध्ये १४ ॲप्स समाविष्ट आहेत. १४ ॲप्समध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार झी ५, सोनी लीव्ह, हूट, सन नेक्स्ट, डिस्कव्हरी+, होईचॉई, अल्ट् बालाजी, इरॉस नाऊ, लायन्सगेट, शेमारु मी, युनिव्हर्सल, व्ह्यूट किड्स, जिओ सिनेमा यांचा समावेश आहे. जिओ फायबर एकाचवेळी अनेक उपकरणांशी कनेक्ट केले जाऊ शकते, त्यामुळे ग्राहक या ॲप्सचे मनोरंजक कार्यक्रम मोबाइल आणि टीव्ही दोन्हीवर पाहू शकतात.
       एंटरटेन्मेंट बोनान्झा अंतर्गत, कंपनीने आपल्या नवीन पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी प्रवेश शुल्क शून्यावर आणले आहे. म्हणजेच, वापरकर्त्यांना सुमारे १० हजार रुपयांच्या सुविधा मोफत मिळतील, ज्यामध्ये इंटरनेट बॉक्स (गेटवे राउटर), सेट टॉप बॉक्स आणि इंस्टॉलेशन शुल्क समाविष्ट आहे. पण यासाठी ग्राहकाला जिओ फायबर पोस्टपेड कनेक्शनचा प्लॅन घ्यावा लागेल. 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!