उंचगांव येथे ‘गोकुळ’ शॉपीचा शुभारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      उंचगांव (ता.करवीर) येथील गोकुळ दूध संघाच्या अधिकृत कृष्णामाई ट्रेडर्स गोकुळ दूध शॉपीचे उदघाटन गोकुळ दूध संघाचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
      या शॉपीमध्ये गोकुळचे दूध, तूप, पनीर, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आंबाश्रीखंड, बासुंदी इत्यादी पदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
      गोकुळ शॉपीच्या शुभारंभप्रसंगी गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सिनेट सदस्य प्रा.मधुकर पाटील, उचगाव सरपंच मधुकर चव्हाण, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, दिनकर पोवार, ईश्वर परमार, सन्नाउल्ला थोरगे, प्रदीप घोटणे, प्रोप्रायटर विकास लाड, अभिजित लाड, इंद्रजित लाड आदी उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!