महिला प्रवाशांसाठी केएमटीच्या विशेष बससेवेचा शुभारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
        कोल्हापूर महानगरपालिका परिवहन (के.एम.टी.) उपक्रमामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थीनी, नोकरदार व नियमित प्रवास करणाऱ्या महिलांकरितां “विशेष बस सेवेचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शाहू स्टेडियम येथून करण्यात आला. 
       यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, महापालिका उप-आयुक्त रविकांत आडसुळ, अति.परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव, सहा.आयुक्त विनायक औंधकर आदी उपस्थित होते. 
       सदरची बस शालेय – महाविद्यालयीन महिला विद्यार्थीनी, महिला कर्मचारी तसेच अन्य महिला वर्गासाठी श्री शाहू मैदान येथून आर.के.नगर-जिल्हा परिषदमार्गे शुगरमिल व परत शुगरमिल येथून मार्गस्थ होऊन जिल्हा परिषद-आर.के.नगर मार्गे श्री शाहू मैदानपर्यंत धांवेल.  या बसमधून महिला प्रवाशांसोबत असणाऱ्या ३ ते १२ वयापर्यंतच्या लहान मुलांना प्रवास करता येईल. 
      या विशेष बस सेवचा लाभ अधिकाधिक महिला प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करण्यात आले आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!