लोकाश्रय मिळालेले नेतृत्व: हसन मुश्रीफ

Spread the love


कोल्हापूर :
     राज्याच्या राजकीय पटलावर वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस.
      सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकासाची गंगा सामान्यांच्या दारापर्यंत घेऊन जाणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे लोकाश्रय मिळालेले नेतृत्व आहे. पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन गेली चाळीस वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कणखरपणे उभे असलेल्या या दिलदार नेतृत्वाला कागलच्या जनतेने सत्तेच्या सिंहासनावर बसवलेले आहे.
      सर्वसामान्य माणूस आपले शक्तिस्थळ आहे. या शक्तीस्थळाच्या जोरावरच त्यांनी कागल मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री म्हणून विविध खात्यांचा कार्यभार सांभाळताना, त्या-त्या खात्यांचा सखोल अभ्यास करून राज्यातील जनतेला योजना थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजेत, ही त्यांची धारणा असल्याने त्यांच्याकडे कोणत्याही खात्याचा कार्यभार दिला की त्या खात्याच्या माध्यमातून हे लोककल्याण आणि लोकहिताच्या योजना राबविण्यात यशस्वी होत आहेत.
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाते.
     कोल्हापूर  जिल्ह्यातील कोल्हापूर महापालिका, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक यासह सहकारी साखर कारखाने व सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आपल्या कामाच्या पद्धतीने स्वकर्तृत्वाने लोकांची मने जिंकणारे, सर्वसामान्यांचा आधारवड, कृतीशील विचारांचा गतिशील नेता, सर्वांच्या हक्काचा आधार अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!