गोकुळच्यावतीने लेफ्टनंट साईप्रसाद पाटील यांचा सत्कार


कोल्हापूर  • प्रतिनिधी
      राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रूक गावाच्या साईप्रसाद विष्णू पाटील यांची भारतीय सैन्यदलात पंजाब रेजिमेंट (पश्चिम बंगाल) येथे लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल गोकुळच्यावतीने चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी देशसेवा करण्यासाठी साईप्रसाद याचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील तरुणांनी सैन्यदलात फक्त भरती होण्यापेक्ष्या सैन्य दलातील अधिकारी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहावे, असे मनोगत व्यक्त केले.
     यावेळी सत्कारला उत्तर देताना साईप्रसाद म्हणाला कि, महाराष्ट्र  राज्यातील अग्रगण्य आणि माझ्या कोल्हापूर भूमीतील गोकुळ दूध संघात होणारा माझा सत्कार हा माझ्यासाठी अभिमानास्पद व ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. माझी भारतीय सेन्यदलात अधिकारी पदावर जाऊन देश सेवा करण्याची स्वतःची जिद्द होती ती आज पूर्ण झाली. याचा आनंद मला व माझ्या कुटुंबियांना आहे. माझ्या या यशात  माझे आई-वडील, चुलते प्रा. जालिंदर पाटील यांच्यासह नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची मोलाची साथ लाभली.
      यावेळी जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, अभिजित तायशेटे, अजित नरके, नवेद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजीत पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरीषसिंह घाटगे, चेतन नरके, श्रीमती अंजना रेडेकर व सौ. शौमिका महाडिक यांच्यासह  कार्यकारी संचालक, बोर्ड सेक्रेटरी व संघाचे अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *