कोल्हापूर • प्रतिनिधी
माजी खासदार एस.के. डिगे मेमोरियल फौंडेशन, कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष सदानंद शंकरराव डिगे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काव्यपुष्पांजली वाहिली आहे. “६ डिसेंबरचे भान मनी राहू द्या” अशी शिर्षक असलेली सदानंद डिगे यांची काव्यरचना आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या सुचनांचे पालन करत यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा होत आहे. त्यासंबंधी सदानंद डिगे यांनी काव्यातून म्हटले आहे की, संकट आहे कोरोनाचे, अभिवादन करू अंतरा – अंतराने.
कर्तव्य आपुले, प्रशासनाचे नियम पाळणे, एकेठिकाणी करू नका गर्दी, तोंडावर मास्क असू द्या, कायदा बाबासाहेबांचा आहे, जन हो समजून घ्या |
६ डिसेंबरचे भान मनी राहू द्या
—————————————
६ डिसेंबरचे भान मनी राहू द्या
हा आनंदाचा नाही दिवस, दुःखाचा आहे हे समजून घ्या |
भीमाने संसाराची पर्वा केली नाही,
विचार वंचित मानवांचा केला
एकटा लढून सर्वांशी न्याय मिळविला, कोणीही नव्हते त्यांच्या सोबतीला
जाण तयाची तुम्हा आहे का ?
हे विचारून एकदा मनास घ्या
हा आनंदाचा नाही दिवस, दुःखाचा आहे हे समजून घ्या |
तरुण पिढीला कसा कळेना,
भीमरायाचा त्याग रे
नाही जगले स्वत:साठी,
आठवा त्यांचे उपकार रे
वेळ पुन्हा ती जाणू नका, ध्यास मनी राहू द्या
हा आनंदाचा नाही दिवस,
दुःखाचा आहे हे समजून घ्या |
आज महापरिनिर्वाण दिनी,
त्यांचे कार्य आठवु मनी
मौज – मजा, पार्टी टाळून,
इतिहास घेऊया त्यांचा समजुनी
करा विचार स्वतःचा, समाजाचा, बाबासाहेब डोक्यात राहू द्या
हा आनंदाचा नाही दिवस,
दुःखाचा आहे हे समजून घ्या |
नको दारात रांगोळी, केसात गजरा, कपडे नवीन परिधान
वाढदिवस, वाड्:निश्चय, विवाह, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी टाका टाळून
दुःख आपुले डोंगराएवढे,
अशा कार्यक्रमांना तिलांजली द्या
हा आनंदाचा नाही दिवस,
दुःखाचा आहे हे समजून घ्या |
सर्वांनी संकल्प करू,
भीमरायाच्या विचाराने जगण्याचा
बाबासाहेबांना अभिवादन करून,
करूया बदल आचार विचारांचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
प्रत्येकाच्या हृदयात असू द्या
हा आनंदाचा नाही दिवस,
दुःखाचा आहे हे समजून घ्या |
– “समाजभूषण” –
सदानंद शंकरराव डिगे, कोल्हापूर.
मोबाईल नंबर ९३७०२८३१५१
===========================