गुरुनानक यांचा शांतीचा संदेश घेऊन जगूया: मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

Spread the love


      
• सांगली येथे गुरुनानक जयंती सोहळ्याला उपस्थिती
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     गुरुनानक यांनी संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश दिला. त्यांनी शिकविलेल्या आदर्शांची जपणूक करूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या महान महात्म्यांनी दिलेले संदेश आचरणात आणणे हेच त्यांना अभिवादन आहे, असेही ते म्हणाले.
      सांगली येथे गुरुनानक यांच्या ५५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. सिंधी पुरुषार्थी पंचायत ट्रस्ट, सांगली यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
      यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक मयूर पाटील, कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, निकेश गिडवानी यांच्यासह पदाधिकारी व सिंधी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!