सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहूया….
• पालकमंत्री सतेज पाटील यांचे सर्व नागरिकांना आवाहन
कोल्हापूर • प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने शुक्रवार दि. ६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आपण सर्वजण लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहूया.. लोकराजाप्रति कृतज्ञता व्यक्त करुया..
यानिमित्ताने श्री शाहूमिल येथे आयोजित विविध कार्यक्रमांनाही उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.