भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कागल एस.एस.ओ.शाखेचे उदघाटन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कोल्हापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या कागल एस.एस.ओ. या नवीन शाखेचे  उदघाटन नुकतेच झाले.
     भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षेत्रीय प्रबंधक विकास राव यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन झाले. तसेच कोल्हापूर विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक संदीप मोघे यांनी फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून शाखेचे उदघाटन केले.
      कागलनगरीतील विमाधारकांसाठी हे शाखा कार्यालय अतिशय जोमाने काम करेल अशी ग्वाही मान्यवरांनी  दिली.याप्रसंगी विपणन प्रबंधक श्री.जगदिशा, विक्रय प्रबंधक श्री. गुळवणी, मुरगुड शाखेचे प्रबंधक लक्ष्मण कोळी हे प्रमुख उपस्थितीत होते. तसेच असंख्य विमाधारक, विमाप्रतिनिधी, विकास अधिकारी, अधिकारी व कर्मचारी या उदघाटन सोहळ्यास उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शाखा इनचार्ज प्रशांत घाटगे यांनी केले.
…………………………………………..

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!