छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर

Spread the love

     कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन २०२१-२६च्या  निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलची स्थापना करण्यात आली असून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष अनिल सरदेसाई व पॅनेल प्रमुख राजेंद्र गंधवाले, राजेंद्र सावंत, तानाजी पाटील, अमित अवसरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली.
     पत्रकार परिषदेस अनिल सरदेसाई, राजेंद्र सावंत, तानाजी पाटील, रत्नमाला शिंदे, मीनाक्षी शिंदे, प्रदिप कलकुटकी, संभाजी पोवार, उमेश सावंत, प्रकाश महाडेश्वर, दत्ता सुतार, श्रीकांत कोरवी, अमर वेटाळे यांच्यासह पॅनलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
     राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को- ऑपरेटिव्ह बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीसाठी कै.भास्करराव जाधव व कै. छन्नुसिंग चव्हाण यांच्या विचाराने आणि विश्वासराव माने यांच्या समर्थ साथीने बॅंकेमध्ये बदल घडवणे व विकास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणुकीद्वारे बॅंकेत बदल घडविण्यासाठीच नविन उमेदवारांना घेऊन पॅनेल तयार केले आहे.  जाहिरनाम्यातील मुद्यांचे पालन करून बॅंकेच्या आणि सभासदांच्या हिताचा कारभार केला जाईल, असे आश्वासन पॅनेलप्रमुखांनी दिले.
                     उमेदवारांची यादी…..
• सर्वसाधारण प्रवर्ग- अनिल विलास सरदेसाई (पाटबंधारे विभाग), अमित मोहन अवसरे (पाटबंधारे विभाग), राजेंद्र मोहन सावंत (वन विभाग), उमेश विष्णू सावंत (पाटबंधारे विभाग), तानाजी गोविंद पाटील (पाटबंधारे विभाग), शिवाजी गणपती फराकटे (शिक्षण विभाग), सौ. मीनाक्षी अनिल शिंदे (पोलीस विभाग), अमर बाळकृष्ण वेटाळे (वन विभाग), प्रकाश रमाकांत महाडेश्वर (महसूल विभाग), श्रीकांत गणपती कोरवी (पोलीस विभाग).
• महिला प्रवर्ग- सौ. रत्नमाला रावसाहेब शिंदे (पाटबंधारे विभाग), श्रीमंती दिनकर पाटील (आरोग्य विभाग).
• इतर मागास प्रवर्ग- शैलेश राजाराम सुतार (शिक्षण विभाग).
• भटक्या विमुक्त प्रवर्ग- राजाराम दिनकर गंधवाले (पाटबंधारे विभाग) .
• अनुसूचित प्रवर्ग- नामदेव गणपती मोरे (आरोग्य विभाग).
                  जाहिरनाम्यातील काही मुद्दे…..
• वयाच्या ५५ व्या वर्षापुढील ज्या कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानितृत्त केले आहे, असे कर्मचारी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांनी लढा दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार न्याय देऊ.
• बँक आपल्या दारी या संकल्पनेतून सभासद नोंदणी, कर्ज वेळेवर देण्यास प्राधान्य.
• बँकेच्या सदस्यांच्या सहमतीने सुसज्ज इमारत उभारणे.
• विम्यासह कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देणार, जेणेकरून कर्जदाराच्या वारसांवर व जामीनदारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
• गृहकर्ज उपलब्ध करून देणार.
• बॅंकेतील नोकर भरतीसाठी सभादसांच्या पाल्यांचा प्राधान्याने विचार.
• कर्जावरील व्याजदर कमी करणार तसेच ठेवींवर आकर्षक व्याज देणार.
• स्वच्छ व पारदर्शी कारभार करणार.
• सभासदांच्या सुचना विचारात घेऊन धोरणात्मक निर्णय घेणार.
——————————————————-  Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!