स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागा: पालकमंत्री सतेज पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागा, प्रत्येक मतदारसंघातील कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला पाहिजे, कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात १०० टक्के डिजीटल सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. आज तालुकानिहाय सभासद नोंदणीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते.
       कॉंग्रेसच्या डिजीटल सभासद नोंदणी संदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालयात तालुकानिहाय आढावा घेतला. दिवसभरात दक्षिण विधानसभा मतदारसंघ, हातकणंगले तालुका, गगनबावडा तालुका, इचलकरंजी शहर, भुदरगड तालुका, शिरोळ तालुका त्याचबरोबर कागल, गडहिंग्लज आणि चंदगड आदी तालुकानिहाय डिजिटल सभासद नोंदणीचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा घेतला.
       यावेळी बोलताना त्यांनी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागण्यापूर्वी सभासद नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद निवडणुकीकरीता प्रारूप आराखडा अंतिम होवून आरक्षणदेखील जाहीर होईल. यासाठी काही महिन्याचा अजूनही अवधी लागणार असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागावे. तालुकानिहाय ज्या समित्या नेमायच्या आहेत, त्यासाठी यादी पाठवा, त्याला मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागळापर्यंत पक्षाचे काम आणि ध्येय धोरणे पोहचवावीत, सोशल मीडियावर सक्रीय रहा असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.
       दरम्यान, विद्यानंद पोळ, सचिन चावरे आणि सर्फराज रिकीबदार यांनी डिजिटल सभासद नोंदणी संदर्भात माहिती दिली. बूथ निहाय चिफ एनराॅलर नेमताना महिलांना प्राधान्य द्या अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी केल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी काही सूचना मांडल्या. या सूचनांचा निश्चितपणे विचार केला जाईल. पालकमंत्री म्हणून काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र कार्यकर्त्यांनीदेखील पक्ष वाढीसाठी कमी पडू नये असंऊही त्यांनी सांगितले.
       यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, शशांक बावचकर, उमेश आपटे, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रल्हाद चव्हाण,  बजरंग पाटील, शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, विद्याधर गुरबे, भुदरगडचे जाधव, चंदगडचे गणपतराव पाटील, संजय पवार-वाईकर यांच्यासह कॉंग्रेस तालुका अध्यक्ष, आजी माजी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, चिफ एनराॅलर, सर्व सेलचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!