जीएसटी विरोधातील बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठींबा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जीएसटी विरोधात दि.२६ फेब्रुवारी  रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) कडून ‘भारत व्यापार बंद’ च्या घोषणेला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनेतर्फे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.
      कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार संम्मेलन नागपुरात झाले. या राष्ट्रीय व्यापार संम्मेलनामध्ये कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी जीएसटी विरोधात दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘भारत व्यापार बंद’ व ‘देशव्यापी चक्काजाम’ ची संयुक्तपणे घोषणा केली आहे.
      दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या ‘भारत व्यापार बंद’ व ‘देशव्यापी चक्काजाम’ बाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिवाजीराव देसाई सभागृहामध्ये शनिवारी (दि.२०) बैठक झाली. या बैठकीत जीएसटी विरोधात दि.२६ फेब्रुवारी रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) कडून ‘भारत व्यापार बंद’ च्या घोषणेला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनेतर्फे पाठींबा जाहीर करण्यात आला.
    प्रस्ताविक कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली, उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, चार्टर्ड अकौंटंट दीपेश गुंदेशा, चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदिपभाई कापडीया व संचालक अजित कोठारी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन मानद सचिव जयेश ओसवाल यांनी केले व आभार उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी मानले.
      यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, राजू पाटील, वैभव सावर्डेकर, संचालक भरत ओसवाल, विज्ञानंद मुंढे, प्रशांत शिंदे, राहूल नष्टे तसेच सर्व सभासद व व्यापारी उपस्थित होते. 

Like many brand-only drugs, Cialis prices have crept up slowly. viagra tablets Tadalafil tablets are a phosphodiesterase 5 PDE5 inhibitor indicated for the treatment of erectile dysfunction ED , the signs and symptoms of benign prostatic hyperplasia BPH , and when does cialis come off patent in australiacialisau both ED and the signs.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!