‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा ‘लकडाऊन’ हा चित्रपट शुक्रवारी (दि.२५) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
      लकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटाला संतोष मांजरेकर यांचे दिग्दर्शन आणि ईष्णव मीडिया यांची निर्मिती आहे.लॉकडाऊनच्या   काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली. पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले. अशाच एका लग्नाची गोष्ट ‘लकडाऊन’ सांगत आहे.
      लॉकडाऊनच्यामध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. लॉकडाऊन नंतर हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत, ज्यात तब्ब्ल १५ नावाजलेले चेहरे एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ जगलेल्या ‘शुभा खोटे’ यांची मुख्य भूमिका आहे. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
      २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून केतन महांबरे आणि रवी थोपट या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचं छायाचित्र दिग्दर्शन ‘धनंजय कुलकर्णी’ याने केले आहे.   चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!