कोल्हापूर महापालिका निवडणुकीत फुलणार कमळ: प्रवक्ते धनंजय महाडिक

Spread the love

• भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत व्यक्त केला विश्‍वास
कोल्हापूर • प्रतिनिधी
      राज्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता अपयशी ठरली आहे. कोल्हापूरकरांचे अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षं प्रलंबित आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरकरांना बदल हवा आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी भाजप हाच सक्षम पर्याय असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निश्‍चित कमळ फुलणार असल्याची खात्री माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
      महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत आज ते बोलत होते. दरम्यान, माजी खासदार धनंजय महाडिक यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोल्हापूर महानगरपालिका प्रभारीपदी आणि राहुल चिकोडे यांची महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल भाजपच्या पदाधिकार्‍यांनी महाडिक आणि चिकोडे यांचा सत्कार केला.
      कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येणार्‍या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पूर्वतयारीसाठी भाजपचे पदाधिकारी आणि निवडक कार्यकर्त्यांची बैठक अयोध्या हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी पदाधिकार्‍यांनी निवडणुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.  
      भाजपचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहरातील थेट पाईपलाईन, रंकाळ्याची दुरवस्था, रस्ते आणि ड्रेनेजची समस्या, असे रखडलेले प्रश्‍न लोकांसमोर मांडावेत, असे आवाहन महाडिक यांनी केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!