कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापुरी बाज असलेली मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला’ होय. यामध्ये मला भूमिका करायला मिळाली, त्यामुळे मी खूप खुश आहे, असे योगिता चव्हाण यांनी मत व्यक्त केले. कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला ही मालिका सुरू आहे.
अंतरा व मल्हारची गोड प्रेम कथा आहे. अंतरा आणि मल्हार म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकांचे विचार आहेत. अंतरा तिचं कुटुंब चालवण्यासाठी रिक्षा चालवते ती भावनिक अशी आणि नात्याला विश्वास देणारी आहे. अंतरा रिक्षासोबत बोलते तिची काळजी घेते अशी वेगळी भूमिका मला जीव माझा गुंतला या मालिकेतून करायला मिळाली आहे. कोल्हापूरच्या रिक्षावालीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली तशी ही संधी चांगली आहे पण आव्हानात्मक आहे. ही भूमिका करताना मला खूप मजा आली प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमध्ये अंतराची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे त्याबरोबरच महिलांनी रिक्षा चालवायची पद्धत आता आपल्याकडे आली आहे,, त्या महिलांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालेली आहे असे मला वाटते. कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी ही मालिका आहे असेही मत यावेळी योगिता चव्हाण यांनी व्यक्त केले.