दोन दिवस अपूरा व कमी दाबाने पाणीपुरवठा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिंगणापूर व बालिंगाजवळ नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने दोन दिवस अपूरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
     कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर व बालिंगाजवळ नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशन येथे पाणी उपसा पुरेशा प्रमाणात होत नाही. पाटबंधारे विभागाकडून धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. हे सोडलेले पाणी पंचगंगा नदीपात्रामध्ये शिंगणापूर बंधारा येथे येण्यासाठी गुरूवार दि. ३ जून  दुपारपर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारी व गुरूवारी संपूर्ण कोल्हापूर शहर व त्यास संलग्नीत उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना होणारा पाणीपुरवठा अपूरा व कमी दाबाने होईल. तर काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
———————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!