संताजी घोरपडे साखर कारखान्याची १ते१५ फेब्रुवारीची एकरकमी एफआरपी जमा

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
      सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १ ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची २६ कोटी, १० लाख रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याने तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत. गुरूवारपासून (दि. १० )  संबंधितांनी बँकांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन, कारखाना प्रशासनाने केले आहे.
       पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे,  फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या  ८८, १७६ टन ऊसाची प्रतिटन २,९६० रुपयेप्रमाणे ऊसबिलाची रक्कम २६ कोटी, १० लाख, ९७५ रुपये  होते. त्यापैकी, दोन कोटी, ६० लाख, १२ हजार, ९२० रुपये  विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केले आहेत. २३ कोटी, ४९ लाख, ८८ हजार, ०५६ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत.
       शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!