मराठी चित्रपट महामंडळ कार्यालयात कै. मधुकर देशपांडे यांना श्रद्धांजली

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान संचालक, जेष्ठ निर्माते व वितरक मधुकर (अण्णा) देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रमुख कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी केले. यावेळी सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक सतिश बिडकर,रवींद्र गावडे, प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर, रोहन स्वामी,अरुण भोसले (चोपदार)इत्यादि उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!