महाडिक परिवाराकडून मेघोलीतील नुकसानग्रस्तांना १ लाखांची मदत सुपूर्द

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मेघोली बंधारा फुटल्याने नवले येथे एका महिलेसह आठ जनावरे वाहून गेली होती. त्यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेतली होती. दुर्घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबांना महाडिक यांनी १ लाखाची मदत जाहीर केली होती. दिलेला शब्द पाळत, आज धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते एक लाख रुपये त्या कुटुंबांना देण्यात आले.
     मागील आठवड्यात मेघोली धरण फुटून, सहा गावांतील शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. तर नवले इथल्या एका महिलेसह आठ जनावरे वाहून गेली. भाजपचे प्रवक्ते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नुकसानग्रस्त परिसराला भेट दिली होती. त्यावेळी महाडिक यांनी नुकसानग्रस्तांसाठी एक लाखाची मदत जाहीर केली होती. त्यानुसार धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष युवा नेते पृथ्वीराज महाडिक यांनी आज मोहिते यांच्या घरी भेट देवून, एक लाख रुपये दिले. त्यापैकी जनावरे वाहून गेलेल्या निवृत्ती मोहिते यांना ५० हजार, जनाबाई मोहिते या मृत महिलेच्या कुटुंबाला ४५ हजार आणि तलाव फुटलेल्या कालावधीत जीव धोक्यात घालून मदतकार्य करणार्‍या संतोष सुतार, प्रविण पाटील,सचीन पाटील, प्रकाश पाटील, नामदेव मोहिते यांना ५ हजार रूपयांची मदत देण्यात आली. तर संतोष सुतार यांना वैद्यकीय उपचारासाठीसुध्दा मदत करण्यात आली. यापुढेही महाडिक कुटुंबिय नेहमी सोबत असेल, अशी ग्वाही पृथ्वीराज महाडिक यांनी दिली.
     यावेळी भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा देसाई, प्रविणसिंह सावंत, अल्केश कांदळकर, प्रकाश वास्कर, बाजीराव देसाई, अनिल तळेकर, युवाशक्तीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे, शशिकांत पाटील, प्रवीण आरडे, तुकाराम देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!