माजी खा. महाडिक यांच्या पुढाकाराने अद्ययावत कोव्हीड सेंटरला सुरवात


कोल्हापूर • प्रतिनिधी
     निवडणुकीमध्ये जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवामुळे खचून जाणार्‍यांपैकी महाडिक नाहीत. समाजसेवेचे अखंड व्रत जोपासलेल्या धनंजय महाडिक यांनी हे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू करून, सर्वसामान्य रूग्णांची मोठी सोय केली आहे. भविष्यात त्यांनी सर्वसामान्य रूग्णांना माफक दरात उपचार देणारे हॉस्पिटल सुरू करावे. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. 
     भाजप-ताराराणी आघाडीच्या सहकार्याने हॉकी स्टेडियमजवळ सुरू केलेल्या १२५ बेडच्या अद्ययावत कोव्हीड सेंटरच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते.
      माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने कोल्हापूरातील हॉकी स्टेडियमजवळ पाच मजली इमारतीत १२५ बेडचे अद्ययावत कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. भाजप – ताराराणी आघाडीच्या सहकार्याने आणि महापालिका संचलित या कोव्हीड सेंटरचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कोव्हीड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
       यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी, कोव्हीड सेंटर सुरू करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. राज्यात बहुतांश जिल्हयात कोरोना संसर्गाची लाट ओसरत असली तरी, मात्र कोल्हापुरात अजुनही कोरोना संसर्गाचा जोर कायम आहे. प्रचंड रूग्ण वाढल्याने सीपीआर हॉस्पिटलवर ताण आला आहे. तर खाजगी दवाखान्यात उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. ही बाब लक्षात घेवून, आपण हे अद्ययावत आणि सुसज्ज कोव्हीड सेंटर सुरू केले. आता ऑक्सिजन किंवा बेड मिळाला नाही म्हणून एकाही रूग्णाचा मृत्यू होवू नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे थनंजय महाडिक यांनी सांगितले.
      यावेळी बैतुलमाल कमिटीसह आयसोलेशनमधील डॉक्टर आणि विविध आरोग्य केंद्रातील कोव्हीड योध्दयांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहूल चिकोडे, माजी आ. सुरेश हाळवणकर, महेश जाधव,  माजी नगरसेवक सत्यजीत कदम, सुनील कदम, भगवान काटे, विजय सुर्यवंशी, सुहास लटोरे, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, अमोल पालोजी यांच्यासह भाजप – ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *