महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज चे महिला उद्योजकता धोरण जाहीर

Spread the love

• जागतिक महिला उद्योजकता दिनानिमित्त घोषणा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे जागतिक महिला उद्योजकता दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्रासाठी महिला उद्योजकता धोरण जाहीर करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
      चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या कोअर समितीच्या मार्गदर्शनाखाली महिला उद्योजकता धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देऊन ललित गांधी म्हणाले की २०२२मध्ये नाशिकमधील महिला उद्योजकता क्लस्टरच्या उद्घाटनापासून याच्या अंमलबजावणीची सुरूवात केली जाईल. 
      महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता धोरणामध्ये खालील उपक्रमांचा समावेश…..
• महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.
• राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजिकांसाठी सरकारच्या योजनांविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र दोन वर्षात सुरू करणार.
• महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी स्वतंत्र महिला उत्पादन क्लस्टर्सची उभारणी केली जाईल.
• महिलांची उत्पादने विक्रीसाठी राज्यात विक्री व प्रदर्शन केंद्र उभारली जातील.
• विविध बँकांबरोबर सहकार्य करार करून महिलांसाठी प्रकल्प उभारणी कर्ज सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करणार.
• महिला उत्पादन क्लस्टर्स व विक्री व एक्झीबिशन सेंटर्स निर्मितीचा कालबध्द कार्यक्रम निश्‍चित.
• राज्यस्तरीय महिला विभागाबरोबरच चेंबरच्या सहा विभागात विभागीय महिला समिती कार्यान्वित केल्या जातील.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!