प्राचार्य डॉ.महादेव नरके यांना महाराष्ट्राचा कोविड योद्धा पुरस्कार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     डिजिटल मीडिया संपादक पत्रकार  संघटना महाराष्ट्र यांच्यावतीने डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव मारुती नरके यांना महाराष्ट्र कोरोना योद्धा  पुरस्कार जाहीर झाला आहे.
     ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे उपमुख्यंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी ना. एकनाथ शिंदे, ना. आदित्य ठाकरे, ना. अमित देशमुख, ना.विश्वजित कदम , ज्येष्ठ संपादक राजा माने उपस्थित राहणार आहेत.
      कोविड काळात समाजासाठी दीड वर्षे वेगवेगळ्या उपक्रमातून, संस्था आणि संघटना, वडणगे येथील सोशल कनेक्ट फाउंडेशन या माध्यमातून डॉ.महादेव नरके यांनी काम केले आहे. कोविड पेशंटना बेड मिळवून देणे, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून ३२ हजारांहून अधिक परप्रांतियांना रेल्वेने घरी पाठवणे, त्यांना जेवण आणि दूध उपलब्ध करून देणे ६४२ हून अधिक गरजू आणि हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांना वडणगे येथील सोशल कनेक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य किट वाटप, स्मशानभूमीसाठी एक लाख शेणी दान उपक्रमासाठी पुढाकार, शंभरहून अधिक स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड, मास्क वाटप, आ.ऋतुराज पाटील आणि रोटरी क्लब या माध्यमातून कोविडरुग्ण यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्धता, वडणगे, गिरगाव, कसबा बावडा कोविड सेंटरसाठी साहित्य वाटप, कोटा येथे प्रवेश परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्याना घरी पाठवण्यासाठी प्रशासकीय पाठपुरावा आदी उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
     या पुरस्काराबद्दल डी.वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, उपाध्यक्ष पालकमंत्री ना. सतेज पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!