महावसुली सरकारला सत्तेत राहायचा अधिकार काय? : भाजपाचा सवाल

Spread the love

• गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी 
   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले. या घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्रभर गृहमंत्री आणि या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे.
भाजपा कोल्हापूर च्यावतीने रविवारी बिंदू चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
      यावेळी राज्य सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी या महावसुली सरकारचा तीव्र निषेध केला.
‘१०० कोटी माझे, आता नाहीत वाझे माझे’, ‘महावसुली सरकारचा धिक्कार असो’, ‘गृहमंत्री राजीनामा द्या’ ‘ अनिल देशमुख हे गृहमंत्री की, वसुली मंत्री’, ‘अनिल देशमुख यांचा धिक्कार असो’, ‘ठाकरे सरकार चले जाओ’, ‘आता तर हे स्पष्ट आहे, ठाकरे सरकार भ्रष्ट आहे’ असे फलक घेऊन घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.
     भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी, ऐतिहासिक दाखला देत ज्या पद्धतीने  विजापूरच्या आदिलशहाने अफजलखानाला करवसुलीसाठी महाराष्ट्रात पाठवले होते त्याच पद्धतीने सर्वसामान्य जनतेची लूट करण्याचे काम गृहमंत्र्यांच्याकडून होत आहे आणि हा त्यांचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी हाणून पाडून अनिल देशमुख यांचा राजीनामा होण्यासाठी जोरदार निदर्शने करत असल्याचे सांगितले.
     याप्रसंगी अजित ठाणेकर म्हणाले, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यावर लाच मागितली असल्याचा देशातील अशा पद्धतीचा पहिलाच प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडला असे सांगितले. हे सरकार महाराष्ट्राची नासाडी करत आहे. या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रात समाजद्रोही घटना वाढत चालल्या आहेत.
     सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील एक मोठे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर जे आरोप केले आहेत, यामुळे या सरकारमधील वसुली एकप्रकारे चव्हाट्यावर येऊन महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम या प्रकरणामुळे उजेडात आले आहे. एका एपीआयसारख्या पोलीस अधिकाऱ्याकडून गृहमंत्री जर १०० कोटी वसुली करून घेत असतील तर गृहमंत्र्यांची एकूण कमाई किती असेल, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे होता.   या सर्व प्रकरणावर जाणते राजे म्हणवून घेणारे नेते सध्या अबोल आहेत. वीज तोडणीसाठी सर्वसामान्य जनतेच्या दारात जातात आणि १०० कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याची पाठराखण या महाराष्ट्रात होत असेल तर ही खरोखरच निंदनीय गोष्ट आहे.   गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनाम घेऊन त्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. 
      याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, ओंकार खराडे, राहुल पाटील, विजय खाडे, महेश यादव, अमर साठे, शैलेश जाधव, सचिन सुराणा, कालिदास बोरकर, नरेंद्र पाटील, प्रशांत गजगेश्वर, दिलीप बोंद्रे, किरण नकाते, विराज चिखलीकर, आसावरी जोरदार, प्रज्ञा मालंडकर, गौरव सातपुते, विवेक वोरा, धीरज पाटील, सिध्दू पिसे, विजय पाटील, दिनेश पसारे, प्रकाश घाडगे, तानाजी निकम, विठ्ठल पाटील, बापू राणे, महेश मोरे, अरविंद वडगावकर, विशाल पाटील, विशाल शिराळकर, अक्षय निरोखेकर, जयदीप मोरे, सिद्धार्थ तोरस्कर, महादेव बिरंजे, दत्ता लोखंडे, गिरीश साळोखे, रहीम सनदी, माणिकराव बाकडे, सौ खाडे, सचिन मुधाळे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!