औद्योगिक वीजग्राहकांसाठी बुधवारी संवाद मेळावा


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरणच्या कोल्हापूर ग्रामिण विभाग २ अंतर्गत कागल उपविभागामार्फत औद्योगिक वीजग्राहकांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत  गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सभागृहात  तर दुपारी २ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत कागल-हातकणंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सभागृह (पंचतारांकित औद्योगिक वसाहत,  रेमंड सर्कल जवळ) येथे करण्यात आले आहे.
    औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज पुरवठा व वीज सुविधा विषयक अडचणी , महावितरणच्या ग्राहक सुविधा व सवलत योजना याबाबत संवाद मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. या मेळाव्याचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *