डॉ. आंबेडकर जयंतीदिनी महावितरणमध्ये विद्युत सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून जनमित्रांचे ऑनलाईनद्वारे विद्युत सुरक्षा प्रशिक्षण आयोजनाच्या उपक्रमास महावितरणच्या कोल्हापूर मंडळात प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत जयसिंगपूर विभागातील जनमित्रांकरिता पहिले प्रशिक्षण घेण्यात आले. विद्युत सुरक्षेबाबत १५० जनमित्रांशी सुसंवाद साधण्यात आला.
     सांगली लघु प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरी ताम्हणकर यांनी दृकश्राव्य चित्रफिती, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. वीज अपघात रोखण्यासाठी असुरक्षित कृती टाळून असुरक्षित परिस्थितीत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन, अंमलबजावणी व प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पातळीवर काम झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. जनमित्र व ग्राहक या दोहोंच्या जीवितासाठी विद्युत सुरक्षा जनजागृती व नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
     माहे एप्रिल ते जून या कालावधीत विद्युत यंत्रणेची प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन  देखभाल- दुरुस्तीची कामे केली जातात. याच काळात विद्युत अपघाताचे प्रमाणही वाढते. तेव्हा शुन्य वीज अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्याचे हेतूने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्याने सुसंवादातून सुरक्षेचे धडे गिरविण्याचे नियोजन करण्यात आले.  
     कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांचे मार्गदर्शनाखाली विद्युत सुरक्षा जनजागृतीचा हा उपक्रम सर्व विभाग व उपविभागात राबविला जाणार आहे.
जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांनी पाहिले प्रशिक्षण आयोजनात पुढाकार घेतला.
     या प्रशिक्षण सत्रास उपविभागीय अभियंता सुरेश मैलावार, सचिन जगताप, मदन कडाळे, अमोल माने, मुल्ला यांच्यासह जनमित्र उपस्थित होते.
          जयसिंगपूर विभागात रक्तदान शिबीर
     जागतिक संकट कोरोना आजारामुळे रक्ताची कमतरता भासत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे परिपत्रकानुसार  व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जयसिंगपूर उपविभागात रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
      कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर, उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे, सहाय्यक अभियंता बाबासाहेब सोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश आवळे, अल्ताफ लाडखान, सलिम सुतार, अनिल कुंभार, नाना अहिरे, निलेश दिवटे यांनी शिबीर यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!