महावितरणच्या आवाहनास वीज ग्राहकांचा प्रतिसाद ; ३४ कोटींचा भरणा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील १ एप्रिल २०२० पासून एकही बिल न भरलेल्या ३ लक्ष ३१ हजार ९५१ ग्राहकांपैकी २३ हजार १५८ ग्राहकांनी मागील १३ दिवसात ३४ कोटींच्या थकबाकीचा भरणा करीत महावितरणच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर ८३१ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.
   त्यात घरगुती ३ लक्ष ३ हजार ३८ ग्राहक १७२ कोटी थकबाकी पैकी १५ हजार ८४४ ग्राहकांनी १३ कोटी रुपये भरले आहेत. वाणिज्य वर्गवारीत २२ हजार १९५ ग्राहक ३४ कोटी थकबाकी पैकी ५ हजार ६६५ ग्राहकांनी ९ कोटी रुपये भरणा केला आहे. तर औद्योगिक ६ हजार ७१८ ग्राहक ३९ कोटी थकबाकीपैकी १६९९ ग्राहकांनी १२ कोटी रुपये वीज बिल भरणा केला आहे.
      कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुर्भाव असतांनादेखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. 
   महावितरणला प्रचंड मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना २४X७ वीजपुरवठा करण्यासाठी दरमहिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे. महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.  ग्राहकांसाठी सुलभ हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिलेली आहे. तेंव्हा महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी चालू बिलासह थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!