शिरोलीत औद्योगिक वीजग्राहकांसाठी शुक्रवारी संवाद मेळावा


कोल्हापूर • प्रतिनिधी
    महावितरणच्या कोल्हापूर शहर विभाग अंतर्गत मार्केटयार्ड उपविभागामार्फत शिरोली येथील औद्योगिक वीजग्राहकांसाठी शुक्रवार दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत  शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन भवन, श्रीराम फाऊंड्रीसमोर, शिरोली (ता. हातकणंगले) येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    या संवाद मेळाव्यात औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज पुरवठा व वीज सुविधा विषयक अडचणी , महावितरणच्या ग्राहक सुविधा व सवलत योजना याविषयी चर्चा केली जाणार आहे. वीज ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *