पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचा वीजचोरांना दणका

Spread the love

•१८७६ ठिकाणी ४.५७ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस
कोल्हापूर • प्रतिनिधी
      वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणने वीजचोरीविरोधात वेगाने मोहीम सुरु केली आहे.
      पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यात नियमित व विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाई सुरु करण्यात आली आहे.
      महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह सर्व वर्गवारीमध्ये मागेल त्यांना व पाहिजे तेवढ्या वीजभाराची अधिकृत वीजजोडणी उपलब्ध असतानादेखील वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबविण्यात येत आहे व आतापर्यंत १८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. तर ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली देखील करण्यात आली आहे.
     वीजचोरीविरोधात मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे हे स्वतः या मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणच्या पथकांना मार्गदर्शन करीत आहेत व वीजचोरीच्या विविध प्रकारांची पाहणी करीत आहेत.
      कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज, इचलकंरजी, जयसिंगपूर,  कोल्हापूर शहर  तसेच ग्रामीण १ व २ या विभागांमध्ये वीजचोरीविरोधात धडक कारवाई करून वीजचोरीचे प्रकार उघड करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ ठिकाणी ५ लाख २० हजार रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या सर्वच ३५ प्रकरणांत ५ लाख २० हजार रुपयांचा दंड व वीजबिलांची वसुली करण्यात आली आहे.
       उघडकीस आलेल्या सर्व वीजचोऱ्यांप्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ प्रमाणे कारवाई सुरु आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. विद्युत अपघाताचा धोका असणाऱ्या विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन मोठ्या रकमेची दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईमधील कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

En plus des risques pour la santé, la plupart des pharmacies en ligne frauduleuses peuvent mettre en danger les informations personnelles et financières du patient. On peut néanmoins acheter du viagra en ligne en toute légalité. viagrasansordonnancefr Beaucoup de pharmacies en ligne ont des offres qui permettent de réduire drastiquement les coûts.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!