महावितरणचे ‘अपघात प्रवण ते अपघात विरहीत क्षेत्र’ अभियान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळातील जयसिंगपूर उपविभागाअंतर्गत माहे डिसेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत ‘अपघात प्रवण ते अपघात विरहीत क्षेत्र’ हे अभियान राबवून वीज यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीच्या केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे यांच्यासह शाखा अभियंता व जनमित्रांचे कौतुक केले.
       जयसिंगपूर उपविभागाने आठवड्यातील दोन दिवस वीज यंत्रणेच्या देखभाल दुरूस्तीचे काम केले. त्यात झुकलेले – वाकलेले वीज खांब सरळ करणे, लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरूस्ती, वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटणी व वेली काढणे इत्यादी कामे पुर्ण करून वीज यंत्रणा सुसज्ज केली.          अभियानकाळात  जयसिंगपूर दक्षिण, जयसिंगपूर उत्तर, जयसिंगपूर ग्रामीण, कोथळी, दानोळी व जांभळी या कक्षाअंतर्गत  १२८ उच्चदाब व १०९ लघुदाब वीज खांब सरळ करण्यात आले. ८० ठिकाणच्या लोंबकळणाऱ्या वीज तारा  पुर्ववत करण्यात आल्या. त्यामुळे या उपविभागात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठ्यासह अपघात विरहीत क्षेत्र होण्यास मदत झाली आहे.
      मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. याबद्दल प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते शाखा अभियंता सर्वश्री बाबासाहेब सोलगे, शशिकांत माने, रोहित सेवेकरी, सलीम मुजावर, चंद्रशेखर पेठकर, अल्ताफ अत्तार यांच्यासह जनमित्रांचा सत्कार करण्यात आला.
———————————————– 

Image courtesy of Blausen Medical Communications. Contact Andrew Walbank. cialis malaysia The copper intrauterine device IUD can be employed as an emergency contraceptive.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!