शिरोलीतील उद्योजकांशी महावितरणच्या प्रादेशिक संचालकांचा संवाद

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिरोली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक प्रतिनिधींसमवेत महावितरणच्या पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी संवाद साधला. उद्योजकांच्या वीज पुरवठा विषयक तक्रारी, अडचणींबाबत श्री. नाळे यांनी चर्चा केली.
     महावितरणच्या आर्थिक विंवचनेची वस्तुस्थिती स्पष्ट करून उद्योजकांनी थकीत व चालू वीज देयके भरून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी  उद्योजकांना केले.
      शिरोली येथील शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात उद्योजकांसमवेत बैठक झाली. महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव  गांधले, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष दिपक पाटील, खजानिस एम.वाय. पाटील, मानद सचिव जयदिप चौगले, संचालक श्यामसुंदर तोतला, प्रशांत शेळके, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, फाँड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, शिरोली ॲन्ड रिक्लेमेशन प्लांटचे अध्यक्ष नीरज झंवर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
      शिरोली औद्योगिक वसाहतीमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत कारणमिमांसा करून आवश्यक उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली.  या भागास वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या ११ केव्ही हाय – वे फीडरवर वाढीव भार येत असल्याने  या फीडरवरील  जयसिंगपूर विभागाचा अतिरिक्त भार नव्याने कार्यान्वित  करण्यात आलेल्या३३/११ केव्ही टोप उपकेंद्रावर स्थलांतरीत करण्याच्या सुचना श्री. नाळे यांनी दिल्या. सदर भार स्थलांतरणाचे काम पुर्णही करण्यात आले आहे. याप्रसंगी श्री.नाळे यांनी ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करून तत्पर व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द असल्याचे उद्योजकांना आश्वस्त केले. उपविभागीय अभियंता रविंद्र महाव्दार, शाखा अभियंता संदिप गावडे यांनी बैठकचे नियोजन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!