कोल्हापूर शहराच्या वीजपुरवठ्याचे सक्षमीकरण

• शेंडापार्क ते वायपी पोवारनगर उपकेंद्रादरम्यान भूमिगत वीजवाहिनी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     वीजग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण  सदैव प्रयत्नशील आहे. आता कोल्हापूर शहराचा वीजपुरवठा पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाला आहे. महावितरणकडून कोल्हापूर शहरातील वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, या हेतूने शेंडापार्क व वायपी पोवारनगर  उपकेंद्रादरम्यान भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सदर वीजवाहिनी कार्यान्वित करून नुकताच वीज पुरवठा यशस्वीरीत्या  सुरू  करण्यात आला आहे.
     शेंडापार्क व वायपी पोवारनगर  या दोन उपकेंद्राना जोडणारी ३३ के. व्ही.  गोकुळ शिरगाव उच्च दाब वीजवहिनी भारतनगर झोपडपट्टीतून जात होती.  ती धोकादायक स्थितीत होती. त्यामुळे  पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन  डीपीडीसीच्या रु.२० लक्ष निधीतून  शेंडापार्क व वायपी पोवारनगर या दोन उपकेंद्रादरम्यान ५०० मीटर अंतराची भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. महावितरणकडून चार दिवसाच्या अल्प कालावधीत हे काम पूर्ण केले आहे. 
       या भूमिगत वीजवाहिनीमुळे शाहू मिल, शिवाजी विद्यापीठ, घाडगे पाटील, वाय पी पोवारनगर या चार उपकेंद्राना रिंग फीडिंगची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराचा वीजपुरवठा सक्षम झाला आहे.
     कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे व कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता अजित अस्वले, उपविभागीय अभियंता सचिन पाटील, सहाय्यक अभियंता रविंद्र खोत, प्रशांत सासने यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *