कोल्हापूर • प्रतिनिधी
शहरात मोठया प्रमाणात होळी पौर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पौर्णिमा रविवारी (दि.२८) आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपूरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासियांना केले आहे.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी होळीचा सण आनंदाने साजरा करुन पर्यावरणाचे संरक्षण करा. यामध्ये होळी लहान करुन आपले डांबरी रस्ते खराब होणार नाहीत याची दक्षता घ्या. तसेच होळी लहान करुन वाचलेल्या शेणी महापालिकेच्या स्मशानभुमीस दान करा असे आवाहन केले आहे. यासाठी या फोन नंबर ०२३१- २५४०४३६, २५४०२९ नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
———————————————–