कोल्हापूर ते सांगली रस्ता चौपदरीकरणाच्या कामास गती द्यावी: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     खाजगीकरणांतर्गत बांधा वापरा हस्तांतरित करावयाच्या तत्वावर करण्यात येणारे कोल्हापूर (शिरोली) ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामास गती द्यावी. शासनाची मान्यता घेऊन संबंधीत रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्यासाठी धोरण ठरविण्यात यावे असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुंबई येथे सांगितले.
     बीओटी तत्वावर कोल्हापूर (शिरोली) ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे एस साळुंखे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प व्यवस्थापक पंदरकर, अधिक्षक अभियंता एस. माने, भारतीय राष्‌टरीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी व्यवस्थापक एम.के. वाठोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्रीमती प्रज्ञा वाळके आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
     नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार संबंधित रस्त्याची लांबी राष्ट्रीय महामार्ग झाले असल्याने हे काम केंद्र शासनास हस्तांतरित करण्यात आले होते. हस्तांतरीत लांबीत राष्‌ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्ग काँक्रीटीकरणाचे  व सुधारण्याची कामे प्रगतीत असल्याची माहिती यावेळी अधिका-यांनी दिली.
      संबंधित पुढील रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भातील कामासाठी शासनाची तातडीने मान्यता घेऊन धोरण ठरविण्यात यावे व या कामास गती द्यावी असे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *