पाचगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा: आ. ऋतुराज पाटील यांची सूचना


कोल्हापूर • प्रतिनिधी
    कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव येथील पाणी प्रश्नांबाबत आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी आणि पाचगाव लोकप्रतिनिधी यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. पाचगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना आ. पाटील यांनी यावेळी केली.
      पाचगाव हे शहरानजीकचे झपाट्याने लोकसंख्या वाढणारे उपनगर आहे. यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करत असताना अडचणी येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पाणीपुरवठा अडचणींबाबत आ. ऋतुराज पाटील यांनी बैठक घेतली. पाचगावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना जलअभियंता नारायण भोसले यांना दिल्या. या संदर्भातील तात्काळ कार्यवाही करण्यास सांगितले. तसेच, पाचगावची वाढतील लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा वाढविण्यासंदर्भात प्राधिकरणाचे डी.के. महाजन आणि ए.डी. चौगुले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून सूचना दिल्या.
      यावेळी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प्रवीण कुंभार, नारायण गाडगीळ, संग्राम पोवाळकर, प्रकाश गाडगीळ, धनाजी सुर्वे, विष्णू डवरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *