श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून १८ फुटबॉल पंचांना आर्थिक सहाय्य

Spread the love

• दोन लाख पाच हजार रूपयांची आर्थिक मदत
 कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन (केएसए)चे अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्यावतीने कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनमधील कार्यरत असलेल्या १८ पंचांना रूपये २,०५,०००/- (दोन लाख पाच हजार रुपये) आर्थिक मदत देण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये अशाप्रकारची पंचांना आर्थिक मदत करणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे.
     कोरोना महामारीमुळे क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. कोल्हापुरातील लोकप्रिय फुटबॉल खेळालाही याचा फटका बसला आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून फुटबॉल संघ, खेळाडू व पंच यांना आर्थिक पाठबळ मिळत होते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार स्पर्धा बंद आहेत. स्पर्धा बंद असल्याने फुटबॉलशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांना फटका बसला असून आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. क्रीडा क्षेत्रांमधील खेळाडू, पंच, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, क्रीडा व्यवस्थापक यांनाही त्याची झळ पोहोचली आहे.
     कोल्हापूरात फुटबॉल हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. या खेळाअंतर्गत केएसएच्यावतीने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक फुटबॉल सामने दरवर्षी होत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व फुटबॉल सामने यशस्वी करण्यासाठी केएसएशी संलग्न असणाऱ्या कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अनेक पंच सातत्याने कार्यरत असतात. यातून मिळणाऱ्या मानधनामधून अनेक पंचांना मदत होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सर्व फुटबॉल सामने बंद आहेत. त्यामुळे पंचांना मिळणारे मानधन बंद झाले आणिआर्थिक समस्या निर्माण झाली आहे. हीच गरज ओळखून केएसए अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्य व विफाच्या महिला फुटबॉल समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्यावतीने कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनमधील कार्यरत असलेल्या १८  पंचांना एकूण दोन लाख पाच हजार रूपयांची आर्थिक मदत ३० जुलै २०२१  रोजी न्यू पॅलेस येथे देण्यात आली.
     यावेळी केएसएचे पदाधिकारी दिपक शेळके, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, प्रा.अमर सासने व कार्यकारिणी मंडळातील सदस्य नितीन जाधव, निळकंठ पंडित – बावडेकर, मनोज जाधव, विश्र्वंभर मालेकर – कांबळे, संग्रामसिंह यादव, दिपक राऊत, बाळकृष्ण पोरे, दिपक घोडके तसेच कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे सेक्रेटरी प्रदीप साळोखे व पदाधिकारी आदींसह पंच उपस्थित होते.
                 आर्थिक मदत मिळालेले पंच…..
     योगेश हिरेमठ, सुनिल पोवार, शहाजी शिंदे, राजेंद्र राऊत, गौरव माने, पंकज राऊत, संदीप पोवार, श्रेयस माने, अवधुत गायकवाड, सुमित जाधव, सोमनाथ वाघमारे, माणिक पाटील, नंदकुमार सुर्यवंशी, गजानन मनगुतकर, सतिश शिंदे, अजिंक्य गुजर, अभिजीत गायकवाड, सुर्यदीप माने.
——————————–

error: Content is protected !!