कोल्हापूर • प्रतिनिधी
मानव सुरक्षा सेवा संघाने दिलेला ज्ञान, विज्ञान, कला-क्रीडा-सांस्कृतिक व साहित्य पुरस्कार मी माझ्या वडिलांना समर्पित करीत आहे, असे डॉ. गजानन राशिनकर यांनी सांगितले. ब्रेस्ट कॅन्सरवरील संशोधनाबद्दल त्यांचा पोलीस उपधीक्षक सुनीता नाशिककर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, या सत्कारप्रसंगी डॉ. राशीनकर बोलत होते.
मानव सुरक्षा सेवा संघ कोल्हापूर यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. गजानन राशिनकर यांच्या हस्ते २५ कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. डॉ. गजानन राशिनकर यांनी ब्रेस्ट कॅन्सरवरील संशोधन केल्यामुळे त्यांचा गौरव आला. यावेळी त्यांनी हे संशोधन करताना गेल्या वीस वर्षांमध्ये आलेले अनुभव उपस्थितांसमोर कथन केले.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश गौरी, कोषाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संघटन मंत्री दिलीप शेटे, राज्य महिला उपाध्यक्ष रेणू पिळगावकर, राज्य महिला प्रमुख गीता गायकवाड आणि राज्य महिला प्रवक्ता माधुरी गुजराती यांच्यासह कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शामराव केळकर , जिल्हाप्रमुख संतोष शिंदे, जिल्हा महिला प्रवक्ता विद्यालक्ष्मी राजहंस, जिल्हा अध्यक्ष सविता गंगधर , मंदार तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकमध्ये उपाध्यक्ष अंकुश निपाणीकर यांनी मानव सुरक्षा सेवा संघाचे कार्य आणि कर्तव्य याविषयी माहिती दिली. गीता गायकवाड, सुनिता नाशिककर, माधुरी गुजराती यांनी मनोगत व्यक्त केले.