कोल्हापूर • प्रतिनिधी
राज्य सरकारने सोमवार (दि.१६) पासून महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली महाद्वार चौक येथे ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी अंबामाता की जय, उदं गं आई उदं, जोतिबाच्या नावानं चांगभलं, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी भाजपा प्रदेश ओ.बी.सी.मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष मारुती भागोजी, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सचिन तोडकर, चिटणीस सुलभा मुजूमदार, प्रमोदिनी हार्डीकर, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, मंडल अध्यक्ष डॉ.राजवर्धन, प्रग्नेश हमलाई, रविंद्र मूतगी, भरत काळे, संतोष माळी, संदीप कुंभार, संजय जासूद यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.