मणकर्णिका कुंडाचे काम प्रगतीपथावर


कोल्हापूर • प्रतिनिधी
     श्री अंबाबाई मंदिर परिसरातील मणकर्णिका कुंडाचे काम प्रगतीपथावर असून लवकरात लवकर भाविकांना मणकर्णिका कुंड मुळस्वरुपात पहाता येईल असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
       देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व मणकर्णिका समितीचे सदस्य यांच्यामध्ये आज गरुड मंडप येथे आढावा बैठक झाली. मणकर्णिका कुंडाचे कामासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. मंदिरातील रामाच्या पाराचे काम आणि मणकर्णिका कुंडाचे काम जोरात सुरू असून दोन्ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
     या बैठकीला सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, पुरातत्वचे श्री. कांबळे तसेच मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा, नेर्लेकर,आर्किटेक्ट निंबाळकर,देवस्थान समितीचे इंजिनिअर देशपांडे, सुयश पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *