• कोरियातून थेट ऑक्सिजन पुरवठा व मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीस मदत
कोल्हापूर • प्रतिनिधी
दक्षिण कोरियामध्ये राहूनही आपल्या मातीशी नाळ जोडणाऱ्या मराठी तरुणांनी मदतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. दक्षिण कोरिया येथे महाराष्ट्रातील काही तरुण शिक्षण, संशोधन, नोकरी, बिझनेससाठी स्थायिक आहेत. या महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र येऊन तेथे मराठी मंडळ स्थापन केले आहे. ज्या ज्या वेळी आपल्या मायभूमीला गरज भासेल त्या त्या वेळी या मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. यावर्षी महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा कमी पडल्याने या तरुणांनी थेट कोरियामधून महाराष्ट्राला प्राणवायू पुरविला आहे. तसेच या मंडळामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख २९ हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.
गतवर्षी देखील या मराठी मंडळाकडून कोरोनाच्या काळात राज्याला आर्थिक स्वरूपात मदत प्राप्त झाली होती. या व्यतिरिक्त २०१९ च्या महापूर परिस्थितीतदेखील त्यांनी मदत देऊन दातृत्व दाखविले आहे. दक्षिण कोरियातील या मराठी बांधवानी मानवतेची ज्योत तेवत ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले आहे.
यामध्ये अविनाश कदम, प्रशांत शेवाळे, हेमराज यादव, अभिजित कदम, विनायक पारळे, सावंता माळी, ऋषिकेश ढवळे, सुरेंद्र शिंदे, धीरज मुराळे, अमित भट, महेश शिंदे, शुभम पवार, आकाश फुलारी, किरण शिंदे, अमोल पवार, किरण चौधरी, अल्लख कुलकर्णी, नानासाहेब शिंदे, अमर पाटील, श्री.पोडे, प्रशांत देशमुख, प्रवीण उपरे, सुनील घाटगे, अनिल वळेकर, सुप्रिया पाटील, दीपक पाटील, गणेश साबळे, चिन्मय जोशी, संभाजी शिंदे, विजय चव्हाण, सुशील चाफेकर, संग्राम भोईटे या तरुण तरुणींचा समावेश आहे.
याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.