मार्केट यार्ड व कळंबा जेलमध्ये महापालिकेच्यावतीने लसीकरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवू नये यासाठी आज मार्केट यार्ड व कळंबा जेल याठिकाणी महापालिकेच्यावतीने विशेष कॅम्प लावून लसीकरण मोहिम राबविण्यात आली.
     कोल्हापूर शहरामध्ये ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोविड-१९ लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मार्केट यार्ड येथे येणारे शेतकरी, मजूर, अडत, दुकानदार, व्यापारी यांची संख्या मोठी असल्याने याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव उदभवू नये म्हणून महापालिकेच्यावतीने विशेष कॅम्प लावून ४५ वर्षावरील सर्व ३७१ शेतकरी, मजूर, अडत, दुकानदार, व्यापारी यांना मार्केट यार्ड  येथे लसीकरण करण्यात आले.
    त्याचप्रमाणे कळंबा जेलमध्ये मोठया प्रमाणात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने जेलमध्ये महापालिकेने आज विशेष कॅम्पचे आयोजन करुन १६० कैद्यांचे लसीकरण करण्यात आले.
     यावेळी उप-आयुक्त निखिल मोरे, सहा.आयुक्त संदीप घार्गे व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!