माथेरान येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भाजपामध्ये प्रवेश

Spread the love

• आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
कोल्हापूर • प्रतिनिधी
     भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज कोल्हापूरात रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदमधील १० शिवसेना नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला.
     सासने ग्राऊंडनजीकच्या भाजपा कार्यालयात आज झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाचा स्कार्फ देऊन गुलाबपुष्प व मिठाई देऊन सर्व नगरसेवकांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक काम करण्याची पद्धत, लोकांना मिळणारा सन्मान लक्षात घेऊन या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी नमूद केले. आज मोजक्या कार्यकर्त्यांचा झालेला हा प्रवेश आगामी काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माथेरान या ठिकाणी याच पद्धतीने पुढील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा प्रवेश होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे भारतीय जनता पार्टीचे कार्य सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्यनशील असल्याचे प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवक व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.
         प्रवेश केलेले नगरसेवक व पदाधिकारी…..
     आकाश कन्हैया चौधरी – उपनगराध्यक्ष / आरोग्य सभापती, राकेश नरेंद्र चौधरी – नगरसेवक, संदीप कदम – नगरसेवक, सोनम दाभेकर – नगरसेविका / महिला बालकल्याण समिती सभापती, प्रतिभा घावरे – नगरसेविका / शिक्षण समिती सभापती, रुपाली आरवाडे – नगरसेविका, सुषमा जाधव – नगरसेविका, प्रियांका कदम – नगरसेविका, ज्योती सोनावळे – नगरसेविका, चंद्रकांत जाधव – स्वीकृत नगरसेवक
       आजी-माजी पदाधिकारी प्रवेश…..   
    प्रवीण सकपाळ – शहर संघटक शिवसेना, कुलदीप जाधव – उपशहरप्रमुख / माजी नगरसेवक, प्रदीप घावरे – माजी नगरसेवक, राजेश चौधरी – माजी नगरसेवक, सचिन दाभेकर – युवा सेना उपअधिकारी, लक्ष्मी राजेश चौधरी – माजी उपनगराध्यक्षा, किरण चौधरी – डी ग्रुप अध्यक्ष, तसेच पूनम प्रवीण सकपाळ, शीतल राकेश चौधरी, भारती किरण चौधरी, लक्ष्मण झिंगा शिंगाडे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!