शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मावळ्यांचा चमू रायगडकडे रवाना

Spread the love

• युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी दिला निरोप
कोल्हापूर • प्रतिनिधी 
     रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापुरातून निवडक शिवभक्त मावळ्यांचा चमू रवाना झाला. या सर्वांना युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर निवडक शिवभक्तांच्या उपस्थितीत यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.
     युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या १५ वर्षांपासून ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. अखंड हिंदुस्तानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनन्यसाधारण महत्व आहे. या ऐतिहासिक घटनेला आजही तेवढेच महत्त्व आहे. कारण, अठरा पगड जाती बारा बलुतेदारांची मोट बांधून महाराजांनी स्वराज्याला, सुराज्य बनवण्याची किमया साधली. ही प्रेरणादायी घटना लाखों शिवभक्तांना अखंड प्रेरणा देत असते.
     छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा या सोहळ्याला पुनर्वैभव प्राप्त करून दिले. आज हा सोहळा लोकोत्सव झाला असून, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त दरवर्षी रायगडावर येत असतात. परंतु गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोनामुळे हा सोहळा मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!