कोल्हापूर • प्रतिनिधी
युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रविण पांडुरंग पाटील आयोजित आरोग्य शिबीर संपन्न झाले. गडहिंग्लज हायस्कूल येथे झालेल्या या मोफत आरोग्य शिबीरामध्ये अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाचे उद्घाटन गडहिंग्लज प्रातांधिकारी सौ. विजया पांगारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अथणी, तालुका आरोग्य अधिकारी कुमार पाटील, माजी सैनिक विशाल रावळ,
रेखा पोतदार, वीरपत्नी वैशाली तोरस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. मंगल पाटील, आरोग्य सेविका सविता पाटील, आरोग्य सेविका पुष्पा चिटणीस व मुख्याध्यापक एस. एन. देसाई आदी उपस्थित होते.